आज देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव म्हणजे ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान या नात्यानं नरेंद्र मोदी यांनी सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी नेहमीप्रमाणेच मोदींच्या तिरंगी फेट्याची चर्चा देशभरात रंगताना दिसली. देशाच्या झेंड्याच्या तिरंगी छटा मोदींच्या फेट्यावरही दिसून आल्या.